निसर्गग्रस्त गणेशमूर्ती कारखानदारांना तातडीने मदतीचे आदेश – उद्योगमंत्री सुभाष देसाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये नुकसान झाले असून त्याचा पेण तालुक्यातील गणेशमूर्ती कारखानदारांना नाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या गणेशमूर्ती कारखानदारांना प्रशासनाने तत्काळ मदत देण्याचे आदेश उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पेण येथे दिले आहेत. पेण तालुका गणेशमूर्ती करिता प्रसिद्ध असून येथील गणेशमूर्ती देशात व परदेशातही प्रसिद्ध आहे. पेण तालुक्यात गणेशमूर्तींचे शेकडोंनी कारखाने असून यातील अनेक कारखान्यांचे नुकसान झाले आहे.

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्वतः पेण येथे गणेशमूर्ती कारखान्यांना भेट दिली.  यावेळी सुभाष देसाई यांनी गणेशमूर्ती कारखानदारांच्या व्यथा जाणून घेतल्या.  शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार किशोर जैन यांनी गणपती कारखानदारांना तातडीची मदत व नुकसान भरपाई तत्काळ देण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे शासनाकडून या कारखानदारांना देण्यात येणाऱ्या 50 हजार रुपयांच्या अनुदानाच्या रकमेतही वाढ करण्यात यावी अशी मागणी केली. ज्या गणेशमूर्ती कारखानदारांचा विमा आहे अश्या कारखानदारांना विमा कंपनीने तातडीने मदत द्यावी अशी मागणी किशोर जैन यांनी केली. यावेळी सुभाष देसाई यांनी प्रशासनाने तातडीने कार्यवाही पूर्ण करून गणपती कारखानदारांना मदत घ्यावी असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले.