
सामना ऑनलाईन । पुणे
पुणे शहराच्या वैभवशाली गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुरुवात झाली. त्यापूर्वी मंडई येथील लोकमान्य टिळक आणि लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले गेले. त्यानंतर पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती करून मिरवणूक सुरु झाली. यावेळी महापौरांसह उपस्थित मान्यवरांनी कसबा गणपतीची पालखी खांद्यावर उचलली.
पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आरती करण्यात आली. खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, पोलीस आयुक्त के व्यंकटेशम, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, नगरसेविका गायत्री खडके, माजी आमदार मोहन जोशी, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, अनंत गाडगीळ, बाळासाहेब शिवरकर, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, माजी महापौर अंकुश काकडे, माजी आमदार शरद रणपिसे, कमल व्यवहारे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक महेश लडकत, सिद्धार्थ शिरोळे, गोपाळ चिंतल, राजेंद्र कोंढरे, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, अशोक येनपुरे, अॅड. अभय छाजेड, दिलीप काळोखे यावेळी उपस्थित होते.




























































