गणेश विसर्जन LIVE : पुणे : घोरपडे पेठ, मनपा क्रमांक 8 मध्ये टोळक्यांचा धुडगूस

425

सामना ऑनलाईन । मुंबई

    • विसर्जन मिरवणुकीतील शेवटचे विसर्जन… पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुक सोमवारी दुपारी १.४५ मिनिटांनी संपली
    • कासेवाडी येथील महाराष्ट्र तरुण मंडळाच्या बाप्पाचे नटेश्वर घाट येथे विसर्जन…
    • पुणे : घोरपडे पेठ, मनपा क्रमांक ८ मध्ये टोळक्यांचा धुडगूस; दगडफेक करत अनेक गाड्यांचे नुकसान.
    • पुणे : रात्री 12 नंतर मंडळांनी डीजे बंद केला, परंतु पुणे महापालिकेच्या स्वागत कक्षातील स्पीकर्स सुरूच होता.
     डीजे बंदी पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेश मंडळांकडून दिवसभर सविनय कायदे भंग करण्यात आला मात्र रात्री 12 ला सर्व डीजे बंद केले.
    • पुणे : कर्वे रस्त्यावरील मेट्रोच्या साहित्यावर धुडगूस
    • बेळगाव : समाजकंटकांनी विसर्जन मिरवणुकीवर केली दगडफेक, गाड्यांच्या काचा फोडल्या
    • पुणे : दगडूशेठ हलवाई गणपती गणपती चौकात, मिरवणुकीचे पथक हुजूरपागा येथे दाखल.
    • पुणे : दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन रथात आगमन.
    • पुणे : केळकर रस्त्यावरील डीजे पोलिसांनी बंद पाडले, टिळक रोड पोलीस कार्यकर्ते भिडले.

 • अलका चौकात मोबाईल चोरट्यांना दामिनी पथकाने रंगहात पकडले.
 • मुंबई : गिरगाव विसर्जनादरम्यान जमा झालेला जनसागर
 • girgaon-visarjan
 • नाशिक : भाजप आमदार बाळासाहेब सानप यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाणी
 • पुणे : खडकीमध्ये डीजे लावण्यावरून पोलिसांना जबर मारहाण, पोलीस हवालदार थिटे जखमी.
 • पोलिसांनी केली दोघांना अटक
 • पुणे : मंडई गणपती बेलबाग चौकात.
 • पुणे : मिरवणुकीदरम्यान काशेवाडी भवानी पेठेत दोन गटात मारहाण.
 • मुंबईत चौपाटीवर ड्रोन द्वारे पोलिसांनी नजर
 • पुणे : मिरवणुकीदरम्यान काशेवाडी भवानी पेठेत दोन गटात मारहाण.
 • बुलढाणा : मेहकर तालुक्यात गणेश विसर्जनादरम्यान दोघांचा बुडून मृत्यू.
 • मुंबई: गिरगाव चौपाटीवर आतापर्यंत 1680 घरगुती आणि 186 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन.
 • मुंबई: सहा वाजेपर्यंत 10,778 गणपतींचे विसर्जन
 • पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपरी कावळ गावात गणपती विसर्जन करताना तीन लहान मुलांचा बुडून मृत्यू.
 • मुंबई : प्रभादेवीच्या राजाच्या मिरवणुकीला सुरूवात
 • नांदेड : जिल्ह्यात येसगी तालुक्यात विसर्जनादरम्यान मांजरा नदीत २२ वर्षीय तरुणाचा बूडून मृत्यू. गंगाधर बरबडे असे मृत युवकाचे नाव.
 • जालना : गणपती विसर्जनादरम्यान मोती तलावात तीन युवकांचा मृत्यु
 • सिंधुदुर्ग :  कुडाळमध्ये अकरा दिवसांच्या बाप्पांना निरोप

 • नाशिक  : गणपती मिरवणूकीत कोंबड्याची कुकुड कु धमाल

 

 • पुण्यातील अलका टॉकीज चौकातून दोन तासात १५ मोबाईलची चोरी.
 • पुणे: जिलब्या गणपती मंडळाचे समर्थक पथक बेलबाग चौकात.इतर मंडळे थांबवून रात्रीचे महत्वाचे मंडळ रांगेत.
 • पुणे: मानाच्या गणपतीची मिरवणूक पावणे आठ तास चालली.
 • त्वेष्टा कासार गणपती मंडळाचे अलका टॉकीज चौकात आगमन…मंडळाचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सव
 • पुणे : गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन.
 • पुणे : मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे विसर्जन.
 • पुणे : नरेंद्र मंडळाने डीजे बंदीचा नोंदवला निषेध.
 • मुंबई :  मुंबईच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन.
 • राहुरी : विसर्जनासाठी मुळा नदीकाठी कृत्रिम हौदाची पुरेशी व्यवस्था करण्यास नगर परिषद प्रशासन असमर्थ असल्याने यंदाही बहुतांश गणेश मुर्तीचे मुळा नदीपात्रातील दुषित पाण्यात विसर्जन करण्याची राहुरीतील गणेश भक्तांवर वेळ.rahuri-ganesh
 • पुणे : तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन, आतापर्यंत मानाच्या तीन गणपतींचे विसर्जन
 • मुंबई : गणेशगल्लीचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल.
 • मुंबई : मुंबईत आतापर्यंत समुद्र आणि तलावात एकूण 3552गणपतींचे विसर्जन झाले आहे, त्यात सार्वजनिक 73, घरगुती, 3447, तर 12 गौरींचा समावेश आहे. कृत्रिम तलावात आतापर्यंत 550 गणपती विसर्जन करण्यात आले आहे, त्यात सार्वजनिक 5, घरगुती 543, तर 2 गोरींचा समावेश आहे. यादरम्यान सुदैवाने कुठलीच दुर्घटना झाली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले आहे.
 • वाशिम : गणपती मिरवणुकीला सुरुवात, खासदार भावना गळी यांनी केले गणेश पूजन.
 • पुणे : मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे टिळक चौकात आगमन.
 • मुंबई : लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत चोरट्यांचा डल्ला, पाकिट आणि मोबाईल लंपास. तक्रार करण्यासाठी पोलीस स्थानकाबाहेर मोठी रांग.
 • तीन युवक बुडाले होते, एकाला वाचवण्यात यश, तिन्ही युवक परप्रांतीय असल्याची प्राथमिक माहिती.

 

 • सातारा : संगम माहुली येथे गणेश विसर्जनासाठी गेलेल्या २ युवकांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू.
 • पुणे : तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन संपन्न.
 • सातार्‍यात गणेश विसर्जनाला सुरुवात, पारंपरिक वाद्यांच्या गजरात ‘सम्राट’ निघाला.
 • नगर : संगमनेरनजीकच्या प्रवरा नदीपात्रात विसर्जनादरम्यान एकाचा बुडून मृत्यू. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून शोध सुरु. अद्यापही मृतदेह हाती लागला नाही. महसूल खात्याच्या दुर्लक्षामुळे घटना घडली, कार्यकर्त्यांनी सुचना करुनही आडव्या नदीकडे जाणारा रस्ता न अडविल्याने निष्पाप जीवाचा अंत.
 • पुणे : वैभवशाली मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाल्यानंतर, तब्बल सहा तासांनी पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचे विसर्जनझाले. 4 वाजून 03 मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.
 • संभाजीनगर: श्रीसंस्थान गणपतीची पूजा संपन्न. मिरवणुकीला सुरूवात, भक्तांमध्ये उत्साह.
 • पुणे : वारज्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके यांनी अनेक ठिकाणी उच्च ध्वनी यंत्रणा, मिक्सर व डॉल्बीवर जोरदार कारवाई करून अनेक यंत्रणा ताब्यात घेतल्या.
 • आर.के स्टुडियोतल्या बाप्पाचे विसर्जन.
 • पुण्यातील टिळक चौकात अलका टॉकीज येथे प्रचंड गर्दी.
 • पुणे तांबडी जोगेश्वरी  गणपतीचे टिळक चौकात आगमन, ताल ढोलताशा पथकाचा दणदणाट.
 • पुण्यात डीजेचा दणदणाट सुरूच, पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू.
 • उन्हाच्या तडाख्याने विसर्जन मिरवणुकीची गर्दी ओसरली.
 • शास्त्री रस्त्यावरील गणेश मंडळांकडूनही डीजेचा दणदणाट, पोलिसांचे दुर्लक्ष.
 • पुणे – टिळक रोडसह उपनगरात डीजेचा दणदणाट सुरू.
 • नागपूर– मिरवणूक शांततेत सुरू, 26 मंडळांचा मिरवणुकीमध्ये सहभाग
 • पुण्यातील मिरवणुकीत शरद रणपिसे यांनी गिरीश बापट यांना प्रतिकात्मक पोपट देऊन सरकारला पोपटपंचीची उपमा दिली.
 • girish-mahajan-parrot
 • पुणे– गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यामध्ये पोलिसांनी डॉल्बीविरोधात धडक कारवाई करताना डहाणुकर कॉलनी जवळ एक मंडळाचा मिक्सर जप्त केला आहे.
 • पुणे-मानाचा पहिला कसबा गणपती १० वाजून २३ मिनिटांनी विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ झाला.
 • पुणे-मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी १० वाजून ३२ मिनिटांनी मिरवणुकीत सहभागी
 • पुणे-मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती 10 वाजुन 40 मिनीटनांनी विसर्जनासाठी मंडई रस्त्यामार्गे मार्गस्थ
 • पुणे-मानाचा चौथा तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 10 वाजून 50 मिनिटांनी मार्गक्रमण.
 • पुणे-मानाच्या पाचव्या केसरी वाडा गणपती 11 वाजून 10 मिनिटांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला
 • मुंबई– मानाच्या गणपतींच्या विसर्जन मार्गावर गुलाल आणि पुष्पवृष्टी
 • लालबागचा राजा निघाला.. निरोपासाठी भक्तांची तुफान गर्दी
 • नगर– मिरवणूक मार्गावर चौकाचौकात रांगोळी काढून ग्रामदैवत विशाल गणपती विसर्जन मिरवणुकीचे स्वागत
 • मुंबई– परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
 • पुणे– मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम टिळक पुतळ्यापासून बेलबाग चौकाच्या दिशेने
 • नगर– पोलीस प्रशासन आणि मानाचे गणपती यांच्यात अंतिम बैठक सुरू, प्रशासन आणि मंडळे आपल्या भूमिकेवर ठाम
 • लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात
 • लालबागच्या राजाची आरती संपन्न
 • पुण्यातील रस्ते गर्दीने फुलले
 • गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईत भाविकांची गर्दी
 • पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात
 • नगर शहराची ग्रामदेवता विशाल गणपतीची उत्तरपूजा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते संपन्न होऊन विसर्जन मिरवणुकीस सुरुवात
 • nagar-miravnuk
 • नगर- डीजेला बंदी केल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीवर माळीवाड्यातील बारा मानाच्या गणपती मंडळांचा बहिष्कार
 • मुंबई -गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
 • कोल्हापुरात धक्काबुक्कीचा महापौर आणि नागरिकांकडून निषेध
 • चंद्रकांत पाटलांचे सुरक्षारक्षक- पोलिसांची धक्काबुक्की
 • कोल्हापुरात मानाच्या गणपती विसर्जनावेळी महापौर शोभा बोंद्रेंना धक्काबुक्की
 • गणपती विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज
 • प्रत्येक मिरवणूक तसेच चौपाट्यांवरील हालचालींवर 50 हजार पोलीस, सीसीटीव्ही व ड्रोनची बारीक नजर
 • शहरात एकूण 162 विसर्जन ठिकाणांवर करडी नजर
 • सुरक्षेसाठी 50 हजार पोलिसांचा ताफा, क्यूआरटी, एसआरपीएफ, आरएएफ, फोर्स वनच्या तुकडय़ा, होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स, स्काऊट-गाईडचे विद्यार्थी, बॉम्बशोधक व नाशक पथक तैनात
 • गणेशोत्सवादरम्यान डीजे-डॉल्बी लावण्यावर बंदी होती. ध्वनिप्रदूषण करणाऱ्या शहरातील 103 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे
 • ‘लालबागचा राजा’च्या विसर्जनासाठी विशेष बंदोबस्त ; 550 पोलीस कर्मचारी आणि 80 अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात
 • ‘डीजे’बंदी हटवा, नाहीतर विसर्जन करणार नाही ; गणेशोत्सव मंडळांचा इशारा
 • मुंबई उच्च न्यायालयाने डीजे वाजवण्यावर बंदी कायम ठेवल्याच्या निर्णयावर पुण्यातील गणेशोत्सव मंडळांची नाराजी
 • गणेश मंडळ आणि डीजे मालकांच्या शनिवारी पुण्यात झालेल्या बैठकीत विसर्जनात सहभागी न होण्याचा निर्णय
 • सरकारने विशेष अधिकार वापरून डीजेला परवानगी देण्याची मागणी
 • मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर भूमिका स्पष्ट केली नाही तर सरकारचे विसर्जन करण्याचा इशारा

 

आपली प्रतिक्रिया द्या