पुढल्या वर्षी लवकर या! बाप्पाला वाजत-गाजत निरोप

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला…गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात आज अनंत चतुदर्शी दिवशी वाजत-गाजत बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला गणपतींचे भरपावसात विसर्जन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील 37 हजार 841 घरगुती आणि 64 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

2 सप्टेंबर रोजी वाजत-गाजत गणपती बाप्पांचे आगमन झाले. रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा 1 लाख 66 हजार 587 घरगुती गणपतीची, तर 111 ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

अनंत चतुदर्शी दिवशी अकरा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी चार वाजल्यानंतर गणपतीचे विसर्जन सुरु झाले.रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारी गणपतीची पुजाअर्जा करत विसर्जन करण्यात आले. निर्माल्य गोळा करण्याची चोख व्यवस्था रत्नागिरी नगर परिषदेने केली होती.

ratnagiri

रत्नागिरी तालुक्यात 4354 घरगुती 3आणि 9 सार्वजनिक, संगमेश्वर तालुक्यात 7584 घरगुती,सार्वजनिक 3गणेशमूर्ती, राजापुरात घरगुती 7353, सार्वजनिक 3 गणेशमूर्ती, लांजामध्ये घरगुती 1645, सार्वजनिक 6 गणेशमूर्ती, गुहागरात 4350 आणि सार्वजनिक 1 गणेशमूर्ती, चिपळूणात 6682 घरगुती, सार्वजनिक 16 गणेशमूर्ती, खेड मध्ये घरगुती 2114, सार्वजनिक 12, मंडणगड मध्ये घरगुती 560, सार्वजनिक 5, दापोलीत 2620 घरगुती आणि 6 सार्वजिनक गणेशमूर्तीचे आज विसर्जन करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या