लातूर- जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश विसर्जन विहिरी केल्या अधिग्रहीत, विसर्जनाचा प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरासह जिल्ह्यातच मोठी भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. जिल्ह्यात मोठ्या धुमधडाक्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. पाणी टंचाईचे कारण देऊन लातूरकरांवर प्रशासनाचा जबरदस्तीचा वरवंटा फिरवला जात आहे. वर्षानुवर्षे ज्या सार्वजनिक विहिरींमध्ये श्री गणेशाचे विसर्जन केले जात होते त्या विहिरीच जिल्हाधिकारी यांनी अधिग्रहीतत केल्या आहेत. गणेश विसर्जन करण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्याकारणाने लातूरकरांना यावेळी गणेश विजर्सजन करता येणार नाही. गणेश विसर्जन न करता मुर्ती दान करण्याचा फतवाही प्रशासनाने काढलेला आहे.

लातूर जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिलेले आहे. वार्षिक सरासरीच्या 50 टक्के पाऊस झालेला असला तरी जिल्ह्यातील मोठे प्रकल्प, गावतलाव, साठवण तलावात पाणीसाठा झालेला नाही. लातूर शहरास पिण्याच्या पाणी पुरवठा होणाऱ्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातही मृतसाठयातील 5.231 दशलक्ष घनमिटर एवढेच पाणी आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावेळी गणेश विसर्जन न करण्याचा फतवा काढलेला होता. लातूर शहरात वर्षानुवर्षे श्री गणेश विसर्जन होणारी ठिकाणे म्हणजे गोरक्षणसंस्थेची विहिरी, सिंचन भवन औसारोड येथील विहिर, श्री सिद्धेश्वर मंदिराचे कुंड, शासकीय वसाहतीमधील विहिर, आर्वी येथील तिवारी यांची विहिर तसेच कव्हा येथील तलावात श्रीचे विसर्जन केले जात होते. श्री विसर्जन न करता मूर्ती महानगर पालिकेस दान करण्याची सुचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिलेली होती परंतू तेवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट श्री विसर्जन होणाऱ्या विहिरी कायमस्वरुपी अधिगृहीत करून टाकलेल्या आहेत.

महानगर पालिकेने पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या अनुषंगाने या विहिरी अधिगृहित करुन उपलब्ध पाणीसाठा स्वच्छ व सुरक्षित राहील या दृष्टीने कार्यवाही करावी, निर्माल्य विंâवा घाण होवू नये म्हणून दुरुस्ती करुन जाळी बसविण्या यावी त्याचा खर्च टंचाईमधून करण्यात यावा तसेच या विहिरीमधील पाणी पिण्या योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करावी या आदेशाचा भंग केला तर आपत्ती व्यवस्थापण अधिनियम 2005 अन्वये कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही दिलेला आहे.