
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक 215 व जय भवानी प्रतिष्ठान यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्याताडदेव विभागातील नागरिकांसाठी पन्नास टक्के सवलतीत दहा बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या आज सायंकाळी एचपी पेट्रोल पंप, एसी मार्केट ताडदेव येथून रवाना करण्यात आल्या.
शिवसेना उपनेते, सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख, अरुण दुधवडकर, माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांच्या प्रयत्नाने या बस सोडण्यात आल्या आहेत.
यावेळी विभागप्रमुख संतोष शिंदे, विभाग संघटिका युगंधरा साळेकर, मलबार हिल विभाग संघटक अरविंद बने उपविभाग प्रमुख सुजित राणे, शोभा जगताप, हेमंत दुधवडकर, किरण बाळसराफ, हरीश धारिया, यशोदा कोटीयान, प्रभाकर पाष्ठs, सिद्धेश माणगावकर, सुप्रिया शेडेकर, अनिल गवारकर आदी उपस्थित होते.



























































