
पुण्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळत आहे. बुधवारी (27 ऑगस्ट 2025) वाजत-गाजत, ढोल ताशांच्या गजरात बाप्पा घरोगरी आणि मंडळांमध्ये विराजमान होणार आहेत. त्यामुळे पुणेकरांची खरेदीसाठी झुंबड उडालेली पाहायला मिळाली. गणेश भक्तांनी बाजारपेठांमध्ये एकच गर्दी केली होती. सर्व बाजारपेठा फुलून गेल्या होत्या.
(सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)