सेक्सटॉर्शन करणारी टोळी गजाआड , facebook वर ओळख करून करायचे टार्गेट

सोशल मीडियावर ओळख करून त्यानंतर आक्षेपार्ह व्हिडीओच्या माध्यमातून सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळीच्या मुंबई सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही टोळी राजकीय नेते, सरकारी सेवेतील वरिष्ठ अधिकारी यांना टार्गेट करत असायची. फसवणुकीची रक्कम जमा झालेली 58 बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत.

सोशल मीडियावरून ओळख झाल्यावर प्रेमाच्या जाळ्यात ओढून व्हिडीओ कॉल करत नकोसे कृत्य करण्यास भाग पाडले जायचे. सुरुवातीला 2 ते 5 हजार रुपयांची मागणी करून त्यानंतर लाखो रुपये उकळले जात असायचे. जर पैसे न दिल्यास तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला जाईल असे धमकावले जात असायचे. त्या सेक्सटॉर्शनबाबत मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेतली गेली. तपासासाठी खास पथक तयार केले गेले.

मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनखाली सहायक आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ निरीक्षक एस. सहस्रबुद्धे, पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, सहायक निरीक्षक रवी नाळे, अमित उतेकर आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथून तिघांच्या मुसक्या सायबर पोलिसांनी आवळल्या.

आपली प्रतिक्रिया द्या