डिजिटल अटकेची भीती दाखवून फसवणूक करणारी टोळी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डिजिटल अटकेची भीती दाखवून वृद्धाची १ कोटी १२ लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. त्यात एका खासगी बँकेच्या मॅनेजरसह दोन वेब डेव्हलपर्सचा समावेश आहे. राजेशकुमार जैन, तारिक मोमीन, शिखर त्यागी, गौरव गोयल, अजयकुमार शर्मा, चिंतनकुमार देसाई अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दोन लॅपटॉप, वीस मोबाईल फोन, पंचवीस बँक खाती, एटीएम कार्ड, आधारकार्ड जप्त केले आहेत.

तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची डिजिटल अटकेच्या नावाखाली ठगाने एक कोटी १२ लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली. वरिष्ठ निरीक्षक प्रमोद कांबळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुनील
लोखंडे, सहाय्यक निरीक्षक सुदर्शन पाटील, उपनिरीक्षक रोहन अहिरे, विद्याधर पावसकर, रवी पाटील, अक्षय साळवे यांच्या पथकाने तपास सुरू केला. २२ लाख रुपये एका खासगी बँकेच्या खात्यात जमा झाले होते. ते बँक खाते राजेशकुमार जैन याचे होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत तिघांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तारिक, शिखर, गौरवला ताब्यात घेतले. त्या चौघांकडून पोलिसांनी चार मोबाईल हस्तगत केले.

राजेशकुमार हा बँक खातेधारक आहे. शिखर हा एका बँकेत ऑपेरेशन मॅनेजर म्हणून काम करतो-वेगवेगळ्या व्यक्तींची बँक खाती उघडून त्यांची माहिती सायबर ठगांना देत असायचा. गौरव हा दिल्लीचा रहिवासी असून तो वेब डेव्हलपर्स आहे. त्याच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये गुन्हा नोंद आहे-