उत्तर प्रदेशमध्ये दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार, पीडित मुलीची प्रकृती गंभीर

प्रातिनिधीक फोटो

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका 19 वर्षीय दलित तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे. त्यात मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात चार जणांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. बलात्कारानंतर पीडित मुलीला खूप मारहाण करण्यात आली इतकेच नाही तर तिचे जीभही कापली. पीडित मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जेव्हा पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपींविरोधात तक्रार केली तेव्हा पोलिसांनीही याबाबत हलगर्जीपणा दाखवला. पोलिसांनी बलात्कारऐवजी फक्त विनयभंगाची तक्रार दाखल केली.  घटनेच्या 9 दिवसानंतर मुलीला शुद्ध आली आणि तिने झाली हकीगत सांगितली. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असता मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे निष्पण्ण झाले. तेव्हा पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली.

आरोपी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्याला धमकावल्याचे पीडित मुलींनी सांगितले आहे. तसेच आरोपी ठाकूर जातीचे असून तुमचेही उन्न्नाव पीडितेसारखी अवस्था करू अशी धमकी आरोपीच्या कुटुंबीयांनी दिल्याचे पीडित मुलींनी सांगितले आहे. पीडीत मुलीची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.  पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या