अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, धमक्यांना घाबरून मुलीची आत्महत्या

1964

हरयाणामध्ये एका आठवीत शिकणार्‍या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. याबाबत कुठेच वाच्यता करू नये अशी तिला धमकी देण्यात आली होती. त्याला कंटाळून पिडीत मुलीने आत्महत्या केली आहे.

हरयाणाच्या पानीपत जिल्ह्यात एक 13 वर्षाची मुलगी शाळेत जात होती. तेव्हा काही नरधमांनी तिचे अपहरण केले. एका निर्जळ ठिकाणी नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. नंतर आरोपीच्या आईने पीडिते मुलीवर आणि कुटुंबीयांना याबाब वाच्यता न करण्याची धमकी दिली. तसेच तक्रार दाखल न करण्यास दबाव आणला. या सगळ्याला कंटाळून पिडीत मुलीने गळफासून घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अजून कुणालाही अटक केली नसल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या