टोमॅटोपाठोपाठ लसूणही महागला!

टोमॅटोच्या दराने साठी गाठलेली असतानाच लसूणच्या दरातही प्रति किलोमागे 60 ते 70 रुपयांची वाढ झाली आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशातून लसूणची आवक होते. गेल्या महिनाभरात गावठी लसूण 180 रुपयांवरून 240 रुपयांवर तर उटी लसूण 250 रुपयांवरून 320 रुपये किलोंवर पोहोचला आहे. टोमॅटो, लसूणच्या वधारलेल्या बाजारभावामुळे सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट मात्र कोलमडले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या