गौहर खान अडकली लग्नबंधनात, पाहा तिच्या लग्नाचे फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री गौहर खान तिचा बॉयफ्रेंड झैद दरबारसोबत लग्नबंधनात अडकली आहे. झैद हा प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे. मुंबईत त्यांचा निकाह पार पडला असून या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांनी हजेरी लावली होती.

निकाहासाठी गौहरने पांढऱ्या रंगाचा हेवी एम्ब्रॉयडरी असलेला शरारा ड्रेस घातला होता. तर झैदने देखील मॅचिंग शेरवाणी घातलेली. सोमवारपासून झैद व गौहरच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली होती. सोमवारी चिक्सा ही रस्म पार पडली. त्यानंतर गुरुवारी मेहेंदीचा कार्यक्रम होता. यावेळी इस्माईल दरबार यांनी स्वत: गाणे गात कार्यक्रमाला चार चाँद लावले.

गौहर व जैद एकमेकांना गेल्या अनेक दिवसांपासून डेट करत होते. ते कायम सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फोटो शेअर करत असायचे. त्यावरून या दोघांच्या अफेयरच्या चर्चा सुरु होत्या. मात्र त्यानंतर गौहरने त्यांच्या साखरपुड्याचा फोटो शेअर करत त्याबाबत अधिकृत घोषणा केली होती.