Bigg Boss 19 – गौरव खन्ना बिग बॉसचा विजेता

सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस 19’ या रिऑलिटी शोचा जंगी ग्रँड फिनाले सोहळा आज पार पडला. अभिनेता गौरव खन्ना बिग बॉसचा विजेता ठरला असून त्याला बक्षीस म्हणून 50 लाख रुपये मिळाले. फरहाना भट्ट बिग बॉसची उपविजेती ठरली तर मराठमोळा स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणीत मोरे याला तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. गौरव खन्नाने त्याच्या शांत आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्वाने अनेकांच्या मनावर राज्य केले. फरहाना भट्टचा रागीट स्वभाव आणि प्रणितची विनोदी शैली चांगलीच गाजली.