गौतमने साधला धोनीवर निशाणा, केला ‘गंभीर’ आरोप

1687

माजी क्रिेकेटपटू गौतम गंभीर व माजी कर्णधार एम.एस धोनी यांच्यात विस्तव जात नसल्याचे सर्वांनाच माहित आहे. गौतम गंभीरने पुन्हा एकदा धोनीवर निशाणा साधला असून त्याच्यावर गंभीर आरोप केला आहे. टीम इंडियाने जिंकलेल्या एक दिवसीय विश्वचषकात अंतिम सामन्यात गौतम गंभीर 97 वर बाद झाला होता व त्यासाठी त्याने धोनीला जबाबदार धरले आहे. धोनीमुळेच माझे शतक होऊ शकले नाही, असा आरोप गंभीरने केला आहे.

एक दिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाला 275 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचे पहिले तीन फलंदाज 114 धावांवर बाद झाले. त्यानंतर संघाची संपूर्ण भिस्त गौतम गंभीर व धोनीवर होती. गंभीर व धोनीने 109 धावांची जबरदस्त भागिदारी करत टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. गंभीर 97 वर व धोनी 91 वर असताना धोनी गंभीर कडे येऊन म्हणाला आता तीन धावा कर व तुझे शतक पूर्ण कर. मात्र त्याच चेंडूवर गौतम गंभीर बाद झाला. गंभीरच्या मते धोनीने त्याचे खेळावरून लक्ष हटविल्यामुळे हा असा प्रकार घडला.

‘मला बऱ्याचदा प्रश्न पडतो की मी असा कसा 97 वर बाद झालो. मी त्या दिवशी खेळताना कधीच माझ्या व्यक्तिगत स्कोअर बद्दल विचार केला नाही. माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त श्रीलंकेने दिलेलं 275 धावांचं आवाहन होतं. मात्र त्याचवेळी धोनी माझ्याजवळ आला व त्याने मला तीन धावा करून शतक पूर्ण करण्यास सांगितले. त्यामुळे माझे लक्ष्य हे संघाच्या कामगिरीवरून स्वत:च्या कामगिरीकडे वळले. त्यामुळे माझे रक्त सळसळून उठले. जोशात मी होश हरवून बसलो व बाद झालो’, असे गंभीरने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या