
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने 2-0 अशा फरकाने जिंकली. दिल्ली कसोटीमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 7 विकेटने पराभव केला. सामना संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने हर्षीत राणावर करण्यात येत असलेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलं. काही दिवसांपूर्वी माजी खेळाडू श्रीकांत यांनी युट्यूबर हर्षित राणाची गौतम गंभीरमुळे संघात निवड झाल्याचं म्हटलं होतं. तसेच आणखी काही युट्यूबवर सुद्धा अशाच प्रकारे हर्षित राणाच्या संघनिवडीवरून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होतं.
पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना गौतम गंभीर म्हणाला की, “हे लाजीरवाण आहे की तुम्ही एका 23 वर्षांच्या मुलाला टार्गेट करत आहात. हर्षितचे वडील माजी अध्यक्ष नाहीत, किंवा माजी खेळाडू नाहीत. एखाद्याला टार्गेट करणं योग्य नाही. हर्षितला सोशल मीडियावर ट्रोल करणं अत्यंत चुकीचे आहे. त्याच्या मानसिकतेवर याचा काय परिणाम होत असेल. तुम्ही त्याला त्याच्या प्रदर्शनाच्या आधारे टार्गेट करा. फक्त युट्यूब चॅनल चालवण्यासाठी काहीही बोलू नका. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला टार्गेट करा, मी ते सहन करू शकतो पण त्या मुलाला एकटं सोडा. हे फक्त हर्षितच्या बाबतीतच तर नाही, तर भविष्यासाठी देखील आहे. तरुण मुलांना लक्ष्य करू नये.” असे आवाहन गौतम गंभीरने केले आहे.
Delhi: On being asked about bowler Harshit Rana in the post-match press conference, Indian Men’s Cricket Team Head Coach Gautam Gambhir says, “It’s a little shameful. Just to run your YouTube channel, if you are targeting a 23-year-old, it is unfair. His father is neither a… pic.twitter.com/iDrcBn6uvj
— ANI (@ANI) October 14, 2025
टीम इंडिया आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी संघामध्ये हर्षित राणाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या निवडीवर माजी खेळाडू श्रीकांत यांच्यासह अनेकांनी विविध प्रतिक्राय देत गौतम गंभीरमुळे त्याची निवड झाल्याचं म्हटलं आहे. तसेच सोशल मीडियावर सुद्धा त्याला बरच ट्रोल केलं जात आहे.