मदर्स डे – प्रत्येक दिवस आईचा! अभिनेत्री गौतमी देशपांडेने व्यक्त केली कृतज्ञता

आई या एका शब्दात संपूर्ण विश्वाचं अस्तित्व सामावलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आईच असते. त्यामुळे आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्पेशल दिवस कशाला हवाय… माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा ‘मदर्स डे’च असतो, अशी भावना अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने व्यक्त केली आहे.

मे महिन्याचा दुसरा रविवार जगभरात मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने गौतमीने एक व्हिडिओ शेअर करत आपल्या आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे. गौतमी म्हणाली, शूटिंगमधून वेळ मिळाला मी पुण्याला जाते ते आईसाठीच. माझ्यासाठी ती मैत्रीण, मार्गदर्शक असं सबकुछ आहे. माझ्या आठवणीत कधी तिला रडू येते त्या वेळी लहान मुलीप्रमाणे तिची समजूत घालावी लागते. आमच्यात इतपं छान बाँडिंग आहे की, काहीही घडलं की माझा पहिला फोन तिलाच असतो. उद्याच्या मदर्स डेला आम्ही एकत्र नसलो तरी तिला मी खूप मिस करेन.

आपली प्रतिक्रिया द्या