गझलसम्राट पंकज उदास यांचे मराठीत पदार्पण,कविता पौडवाल यांच्यासोबत भावगीत

1145

गझलसम्राट पंकज उदास यांनी  मराठी भावगीत गाऊन मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. ‘रंग धनुचा झुला’ असे गीताचे बोल आहेत. उदास यांच्या चाहत्यांसाठी ही खूशखबर आहे.‘रंग धनुचा झुला’ गीताला ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत दिले असून मंदार चोळकर गीतकार आहेत.  कविता पौडवाल यांचा स्वरही गीताला लाभला आहे. मराठीतील पदार्पणाविषयी पंकज उदास म्हणाले,  महाराष्ट्रात एवढी वर्षे राहूनही मराठी गाणे कधी गायलो नाही. माझ्या तीन दशकांच्या सांगीतिक कारकीर्दीत प्रथमच मराठी भावगीत गायले आहे. खूप समाधान वाटले. कविता पौडवाल म्हणाल्या, पंकज उदास यांच्यासोबत मराठी भावगीत सादर करावे ही माझ्या आईची म्हणजे अनुराधा पौडवाल यांची इच्छा होती. उदास यांच्या आवाजाला पत्की यांच्या  संगीताची जोड देत पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम घालीत भावगीत साकारले आहे.  ‘रंग धनूचा झुला’ हे गाणे YouTube/Kavita Paudwal Music वर डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात प्रकाशित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या