120 टाके आणि 2 तास ऑपरेशन, कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुरडीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील बहरामपूर येथे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका वर्षाच्या मुलीवर दोन दिवसांनी सोमवारी जिल्हा एमएमजी रुग्णालयात उपचार सुरु झाले. मुलीची प्रकृती सतत खालावत चालली होती तसेच एकही प्लास्टिक सर्जन तेथे सापडला नव्हता. त्यामुळे एमएमजी जिल्हा रुग्णालयाच्या ईएनटी आणि जनरल सर्जनने या मुलीचे ऑपरेशन केले. 2 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना 120 टाके घालावे लागले. रियाची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले की, ऑपरेशन दरम्यान मुलीचा चेहरा विद्रूप होऊ नये याची काळजी घेण्यात आली होती. सुमारे 10 दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.

सदर घटना ही उत्तर प्रदेशच्या गाझीयाबाद (Ghaziabad) येथील आहे. विजय नगरच्या बहरामपूरमध्ये राहणाऱ्या एका वर्षीय रियावर भटक्या कुत्र्यानी हल्ला केला. गंभीर अवस्थेतच, वडिलांनी तिला एमएमजी रुग्णालयात नेले, तेथून तिला पीजीआय नोएडाला पाठवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी उपचार केले नसल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलीच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागल्यावर तिला रविवारी पुन्हा एमएमजी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे मुलीला दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.