आनंदवार्ता! 25 हजार पदांसाठी मेगाभरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) मार्फत जीडी कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 25 हजार 487 जागांसाठी मेगाभरती करण्यात येणार आहे. ही सर्व पदे जीडी कॉन्स्टेबल (जनरल डय़ुटी) अंतर्गत भरली जाणार आहेत. दहावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज भरण्याची अखेरची तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे असायला हवे. यामध्ये एससी आणि एसटी प्रवर्गांसाठी पाच वर्षे सूट दिली आहे, तर ओबीसी वर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सूट मिळणार आहे. जनरल आणि ओबीसी वर्गासाठी 100 रुपये फी भरणे आवश्यक असून एससी, एसटी आणि महिला वर्गातून अर्ज भरणाऱया उमेदवाराला फी भरण्याची गरज नाही. या भरतीसाठी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळेल. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती https://ssc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

कोणत्या पदांवर भरती
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) – 616 जागा
पेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) – 14,595 जागा
पेंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) – 5,490 जागा
सशस्त्र सीमा दल (एसएसबी) – 1,764 जागा
इंडो-तिबेटियन सीमा पोलीस (आयटीबीपी) – 1,293 जागा
आसाम रायफल्स (एआर) – 1,706 जागा
विशेष सुरक्षा दल (एसएसएफ) – 23 जागा

एसएससीमार्फत जीडी कॉन्स्टेबल पदे भरणार, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी, 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार

बीएसएफ – एससी – 78, एसटी – 58, ओबीसी – 113, आर्थिक मागास – 53, सामान्य – 222, महिला – 92
सीआरपीएफ – एससी – 870, एसटी – 32, ओबीसी – 1343, आर्थिक मागास – 598, सामान्य – 2523, महिला – 124
आयटीबीपी – एससी – 146, एसटी – 139, ओबीसी – 219, आर्थिक मागास – 109, सामान्य – 486, महिला – 194
सीआयएसएफ – एससी – 1918, एसटी – 1391, ओबीसी – 2959, आर्थिक मागास – 1321, सामान्य – 5547, महिला – 1460
एसएसबी – एससी – 257, एसटी – 167, ओबीसी – 412, आर्थिक मागास – 176, सामान्य – 752, महिला – 00
एआर – एससी – 161, एसटी – 302, ओबीसी – 278, आर्थिक मागास – 157, सामान्य – 658, महिला – 150 एसएसएफ – एससी – 3, एसटी – 2, ओबीसी – 6, आर्थिक मागास – 2, सामान्य – 10, महिला – 00