
सप्तचिरंजीवांपैकी एक आणि भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानल्या जाणाऱया परशुरामाच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून ‘गीतपरशुराम’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 3 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र, महात्मा गांधी मार्ग, विलेपार्ले पूर्व येथे सायंकाळी 5.30 वाजता होईल.
स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र आणि स्वरमाऊली या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘गीतपरशुराम’ सादर होईल. संगीतकार मिलिंद करमरकर असून संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे आहे. माधुरी करमरकर, शंतनू पिंजवडेकर गाणी सादर करतील. तालवाद्य साथ अनिल करंजवकर यांची तर गीतकार- निर्माता वैभव दातार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.


























































