भूगर्भाचे ज्ञान

– प्रतिनिधी

पृथ्वीच्या अंतरंगात घडणाऱया घडामोडींचा वेध घेणारे शास्त्र म्हणजे ‘भूगर्भशास्त्र’. पृथ्वीचे भूगर्भ हे अंतराळाइतकेच आश्चर्यचकित करणारे आणि अनाकलनीय आहे. तेल आणि नैसर्गिक वायूंचा शोध, त्याचे नियंत्रण, ज्वालामुखीच्या हालचाली, भूकंप, पृथ्वीच्या पोटातील हालचाली, त्यावरचे संशोधन, उपाययोजना, पाण्याच्या स्रोतांचा शोध, विविध प्रकारच्या खाणींमध्ये असणाऱया धातूंचा शोध, अशा विविध बाबींचा अभ्यास या विषयात केला जातो. भूगर्भशास्त्रात विषय घेऊन विद्यार्थी आपले भविष्य घडवू शकतात.

यामध्ये सागरशास्त्र, सुदूर-संवेदन व भौगोलिक माहितीप्रमाणे पर्यावरणशास्त्र, अभियांत्रिकी भूगर्भशास्त्र, खाणकाम भूगर्भशास्त्र, भूभौतिकशास्त्र, भूरसायनशास्त्र, पेट्रोलियम भूगर्भशास्त्र, भूरसायनशास्त्र, पेट्रोलियम भूगर्भशास्त्र, इ.विषयांत विद्यार्थी पदव्युत्तर स्तरावर कोणताही एक विषय घेऊन आवडत्या क्षेत्रात नोकरी मिळवू शकतात. यूपीएस्सी आणि एमपीएस्सी या स्पर्धा परीक्षांमध्ये लेखी व मौखिक परीक्षा उत्तीर्ण करून राज्य व केंद्र शासनात पदवी स्तरावर भूगर्भशास्त्र स्पेशलायझेशन मिळवलेले विद्यार्थी यूपीएससी व एमपीएससीची परीक्षा देऊन केंद्र व राज्य शासनामध्ये नोकऱया मिळवू शकतात. महाराष्ट्रातील कोल्हापूर, मुंबई, नागपूर व पुणे विद्यापीठातील महाविद्यालये हा विषय पदवी व पदव्युत्तर स्तरावर शिकवतात. त्याचप्रमाणे औरंगाबाद, जळगाव विद्यापीठात व इतरही विद्यापीठांत हा विषय स्वतंत्ररीत्या शिकवला जातो. साधारणपणे देशातील 60 विद्यापीठांत भूगर्भशास्त्र पदव्युत्तर झाल्यानंतर एम. फिल, पीएच.डी. करता येते. यासाठी पदवी स्तरावर भूगर्भशास्त्र हा विषय असणे आवश्यक आहे.

संस्था

जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, ऑइल ऍण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, स्टील ऑथोरिटी इंडिया लिमिटेड, ऑटोमेटिक मिनरल डिव्हिजन, भारत गोल्डमाइन्स लिमिटेड, सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड, इंडिया स्पेस रिसर्च ऑर्गनायझेन, नॅशनल मिनरल लॅबोरेटरी, मल्टिनॅशनल ऑइल कंपनी, मँगेनीज ओर इंडिया लिमिटेड, ग्राउंड वॉटर सर्व्हे ऍण्ड डेव्हलपमेंट एजन्सी, ऑइल इंडिया लिमिटेड. भूगर्भशास्त्र या विषयात आपले भवितव्य उज्ज्वल घडविण्यासाठी जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था महत्त्वाची आहे. या संस्थेमार्फतच भूगर्भशास्त्रज्ञ तयार केले जातात. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फतही जिऑलॉजिस्टची परीक्षा घेतली जाते. यातील उत्तीर्णांना संशोधक होता येते.

नोकरीच्या संधी

> या क्षेत्रासंबंधित पेट्रोलॉजिस्ट, मरिन जिऑलॉजिस्ट, मिनरलॉजिस्ट, जिओहायड्रोलॉजिस्ट, हायड्रोलॉजिस्ट, पॅलिअन्टोलॉजिस्ट, सेस्मॉलॉजिस्ट, सव्र्हेअर आदी नोकरीच्या संधी मिळू शकतात. या संधी जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, सेंट्रल ग्राऊण्ड वॉटर बोर्ड, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, डिफेन्स रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, नॅशनल जिओफिजिकल इन्स्टिटय़ूट, वाडिया इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी, मिनरल्स ऍण्ड मेटल ट्रेडिग कार्पोरेशन, कोल इंडिया, वेस्टर्न कोल फील्ड, हिन्दुस्थान झिंक मिनरल्स, मिनरल एक्स्प्लोरेशन ऍथॉरिटी, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आदी संस्थांमध्ये मिळू शकते.

> राज्य सरकारमध्ये भूगर्भशास्त्रज्ञांची भरती नियमितरीत्या केली जाते. संघ लोकसेवा आयोगामार्फत जिऑलॉजिस्ट एक्झामिनेशन घेतली जाते. या परीक्षेद्वारे उच्च पदावरील भूगर्भशास्त्रज्ञांची व तंत्रज्ञांची निवड केली जाते.

> करिअरच्या संधी अधिक विस्तारण्यासाठी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केल्यास उपयुक्त ठरू शकेल.

अभ्यासक्रम

राज्य सरकारमध्ये भूगर्भशास्त्रज्ञांची निवड नियमितरीत्या राज्य लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी जिआलॉजिस्ट एक्झामिनेशन घेतली जाते. त्याद्वारे देशस्तरीय मोठय़ा पदाच्या भूगर्भशास्त्रांची निवड केली जाते. भूगर्भशास्त्र हा विषय पदवी स्तरावर शिकता येतो. बऱयाच विद्यापीठांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि गणित या विषयांपैकी कोणत्याही दोन विषयांसोबत ‘भूगर्भशास्त्र’ हा विषय शिकता येतो. या विषयात एमएस्सी वा एमटेक करता येते.

आपली प्रतिक्रिया द्या