
अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या पोलिसावर गुन्हा सिद्ध झाला आहे. त्याला 22 वर्ष आणि सहा महिने अशी कारावासाची शिक्षा झाली आहे.
डेरेक चॉविन असं या पोलिसाचं नाव आहे. गेल्या वर्षी जॉर्ज फ्लॉयड यांची या पोलिसाने हत्या केली होती. निव्वळ संशयावरून डेरेकने जॉर्ज यांच्या मानेवर गुडघ्याचा दाब दिला होता. या दाबामुळे गुदमरून जॉर्ज यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी न्यायाधीश पीटर काहील याने मिनियापोलिस राज्याच्या कायद्यात नमून असलेल्या 12 वर्षं आणि 6 महिन्यांहून अधिकची शिक्षा ठोठावली. या सुनावणीवेळी डेरेकवर आपल्या अधिकार आणि पदाचा गैरवापर करणे तसंच जॉर्जसोबत आत्यंतिक क्रूरता दाखवणे यासाठी ठपका ठेवण्यात आला.
त्यांच्या मृत्युनंतर अमेरिकेत मोठा संघर्ष उसळला होता. अमेरिकन जनमानसातून वर्णभेद पूर्णतः नष्ट न झाल्याची टीका झाली होती. डेरेकला याहून अधिक शिक्षा व्हायला हवी होती, अशी सामान्यांची मागणी आहे. अर्थात एखाद्या कृष्णवर्णीय व्यक्तिच्या हत्येसाठी इतकी मोठी शिक्षा होणारी डेरेक ही पहिलीच व्यक्ती आहे.




























































