
नागरिकत्व कायद्यावरून संपूर्ण देशात गदारोळ सुरू आहे. विशेषतः विद्यार्थ्यांनी या कायद्याला चांगलाच विरोध केला आहे. परंतु या कायद्याला विरोध करणे एका विदेशी विद्यार्थ्याला चांगलेच महागात पडले आहे. सरकारने त्याला मायदेशी पाठवले आहे.
Jakob Lindenthal, a German student at IIT Madras, was asked to leave India immediately days after he took part in anti-CAA protests in Chennai.
Jakob was told that he has violated student visa rules and he says all this happened due to his participation in the protests. pic.twitter.com/RSIPgJi7YD
— Shilpa Nair (@NairShilpa1308) December 24, 2019
जेकब लिंडेथल हा जर्मनीचा रहिवासी मद्रास आयआयटीचा विद्यार्थी आहे. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनात त्याने सहभाग नोंदवला होता. निदर्शनावेळी त्याने एक पाटीही घेतली होती. 1933-1945 काळात आमच्यावर नाझींचे राज्य होत असे या पाटीवर लिहिले होते. जेकबने निदर्शनात सहभाग घेतल्याने विसा नियम भंग केल्याचे सरकारने म्हटले आहे. सरकराने त्याची दखल घेत त्याला आपल्या मायदेशी जर्मनीत पाठवले आहे.



























































