झटपट मिळवा डिजिटल कर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही वर्षांत डिजिटल वैयक्तिक कर्जाचा विस्तार झपाट्याने झाला असून ग्राहक त्यांची संपूर्ण अर्ज प्रक्रिया त्यांच्या मोबाईल ऍपच्या माध्यमातून पूर्ण करू शकतात. नीरासारख्या कंपन्या दरमहा दहा हजार रुपयांच्या आसपास उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना विनातारण पाच हजार रुपयांचे कर्ज वितरित करतात. फोनच्या माध्यमातून अतिशय झटपट आणि सहजरीत्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होते. बँकेत 24 तासांत कर्जाची रक्कम जमा होते.