
कसल्याही प्रकारचा विकास नसल्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर गेवराई तालुक्यातील कटचिंचोली ग्रामस्थांनी एकमुखी बहिष्कार टाकला असल्याचे सविस्तर निवेदन गावकऱ्यांच्या वतीने गेवराई तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दैठण ते कटचिंचोली रस्ता केला नाही, असुरक्षित विद्युत पोल व त्यावरील तारा मोडकळीस आल्या आहेत, गावांतर्गत रस्ते विकास झाला नाही, गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापण नाही, गावातील शौचालयाचे बांधकाम करुनही अनुदान देण्यात आले नाही, पाणी पुरवठा सुरळीत चालू नाही, नाल्यांचे बांधकाम नाही, कटचिंचोली ते पांगुळगावचा रस्ता नाही, शेततळे व शेतरस्ते नाही, स्मशानभूमी नाही, कटचिंचोली ते रेवकी रस्ता नाही आदींसह कसलाही विकास करण्यात आला नाही.
त्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर गेवराई तालुक्यातील कटचिंचोली ग्रामस्थांनी एकमुखी बहिष्कार टाकला असल्याचे सविस्तर निवेदन गावकऱ्यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे. परिणामी प्रशासन व लोकप्रतिनिधीं यांच्या बाबतीत नाराजी आणि रोष व्यक्त करण्यात आला आहे

























































