घाटकोपरमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीचाच खून, आरोपी फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

घाटकोपरमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीचाच खून झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

घाटकोपरमधील पंतनगरमध्ये मुन्ना नागेंद्र आणि त्यांच्या शेजारी राम यादव आणि नन्हे यादव हे दोन व्यक्ती राहत होते. बुधवारी राम यादव आणि  नन्हे यादव हे मुन्ना नागेंद्रच्या दारात जोरजोरात भांडत होते. तेव्हा मुन्ना नागेंद्र या दोघांची भांडणे सोडवण्यास बाहेर आले.

नंतर नन्हे यादवने चाकू बाहेर काढून राम यादवला धमकी देत होता. मुन्ना नागेंद्र दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करत होता. पण नन्हे यादव ऐकण्याच्या तयारीत नव्हता. नन्हे यादवने सुरीने राम यादवर हल्ला केला. तेव्हा मुन्ना नन्हेला अडवण्याचा प्रयत्न करत होता पण नन्हे यादवने मुन्ना नागेंद्रच्या गळ्यावर चाकू फिरवला. मुन्ना तिथेच खाली कोसळला आणि नन्हे यादवने घटनास्थळावरून पळ काढला.

मुन्ना नागेंद्र आणि राम यादव या दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्या आले तेव्हा मुन्ना नागेंद्रला मृत घोषित करण्यात आले. तर राम यादवचीही प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी नन्हे यादव विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.