रंगीबेरंगी टिकल्यांची ‘मास्टर ब्लास्टर’ कलाकृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा आज 48 वा वाढदिवस. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आजही त्याच्याबद्दलचे प्रेम चाहत्यांच्या मनात तसूभरही कमी झालेले नाही. आपल्या या लाडक्या क्रिकेटपटूला वाढदिवसाची अनोखी भेट देण्यासाठी परळच्या अभिषेक साटम या तरुणाने रंगीबेरंगी पेपरच्या तब्बल 30 हजार गोलाकार टिकल्यांपासून मास्टर ब्लास्टर सचिनचे चार बाय आठ फुटांची पोट्रेट साकारले आहे.

सचिनचा जबरा फॅन असलेला अभिषेक साटम हा तरुण दरवर्षी काही ना काही अनोखी कलाकृती तयार करून सचिनचा वाढदिवस साजरा करतो. कला आणि फोटोग्राफी आणि निसर्ग हे त्याच्या आवडीचे विषय. आपल्या कलाकृतीबद्दल दैनिक ‘सामना’शी बोलताना अभिषेक म्हणाला, गतवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील कोरोनामुळे निर्बंध आहेत. त्यामुळे घरच्या घरी काय करता येईल याचा विचार मी केला. हिंदुस्थानने विश्वचषक जिंकला या घटनेला 10 वर्षे झाली. या ऐतिहासिक घटनेबद्दल सचिनचा लॉरेन्स क्रीडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तीच ऐतिहासिक घटना एका वेगळ्या रूपात मांडण्याचा प्रयत्न मी कलाकृतीद्वारे केला आहे.

अशी आहे थीम

24 वर्षे सचिनने देशातील क्रिकेट रसिकांच्या अपेक्षांचं ओझं आपल्या खांद्याकर वाहिलं म्हणून विश्वचषक जिंकल्यानंतर सहकाऱयांनी सचिनला आपल्या खांद्याकर उचलून घेतले. तेच दृश्य पेपरच्या गोलाकार आकाराच्या लाल, पंधरा, काळा, हिरका, पिकळा आणि नीळा या सहा रंगछटा कापरून 30012 तुकडय़ांनी तयार केले आहे. त्याच्या 48व्या वाढदिवसानिमित्त 4 बाय 8 फूट या आकारात ही कलाकृती बनकली आहे. त्यासाठी दोन दिवसाचा कालाकधी लागला आहे. या कामात अभिषेकला त्याची पत्नी हर्षदा आणि प्रतीक, तन्वी या मित्रांची मदत झाली आहे.

 20 कर्षांची कात्रणे, 200 मासिक अन् बरंच काही!

 गेल्या 20 कर्षांत सचिनबद्दल विविध वृत्तपत्रात छापून आलेल्या लेखांची कात्रणे, 200 हून अधिक मासिके, 80 हून अधिक पुस्तके अभिषेकच्या संग्रहात आहेत. लहान असल्यापासून अभिषेकने हे कलेक्शन केले आहे. सचिन सर हे माझ्यासाठी आदर्श आहेत. त्यांनी क्रिकेटमध्ये जी मेहनत घेतली तीच आपण आपल्या करिअरमध्ये घेतली तर आपण आपल्या क्षेत्रातील सचिन तेंडुलकर बनू, असे तो सांगतो.