वाहनाच्या धडकेत महाविद्यालयीन युवती ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

भरधाव वेगात आलेल्या वाहनचालकाने एका बाईकला दिलेल्या धडकेत एका महाविद्यालयीन युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. वैभवी सुनील खिरड असे त्या युवतीचे नाव आहे.

रेल्वे स्टेशन रोड वरील व्यकंटेश कॉलनीत राहणारी वैभवी ही आज सकाळी गुरुगोविंदसिंगपूरा परिसरातील भाजीवली बाई चौकातून तिच्या बाईकवरून जात असताना भरधाव वेगात आलेल्या वाहनाने तिच्या बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातात वैशालीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर वाहनचालक पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच गुरूगोविंदसिंगपूरा पोलिसांनी धाव घेतली. अर्धवट बेशुध्द अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.