
अनोळखी व्यक्तीने एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी केईएम रुग्णालयात घडली. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार मुलीच्या आईवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी ती आईसोबत वॉर्डमध्ये होती. आईचे डायलिसिस सुरू असताना एक व्यक्ती तिच्याजवळ आला आणि सरकारी योजनेतून उपचाराचा खर्च करून देतो असे बोलला. त्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी सोबत चल असे म्हणाला. त्यानुसार मुलगी त्याच्यासोबत जाऊ लागली. पण एके ठिकाणी कुणी नसल्याचे बघून त्याने मुलीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध करताच त्याने तेथून पळ काढला.




























































