
सहा वर्ष एका तरुणाला डेट केल्यानंतर एका तरुणीला अशी गोष्ट समजली त्याने ती हादरुनच गेली. तरुणीचा प्रियकरच तिचा सख्खा भाऊ असल्याचे कळल्याने तिला धक्काच बसला. तिने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकून या घटनेचा खुलासा केला आहे. त्यामुळे युजर्सनाही धक्का बसला आहे.
तरुणीने लिहीले होते की, मला नुकतेच कळले की ज्या तरुणाच्या गेली 6 वर्षे प्रेमात होते तो माझा सक्का भाऊ निघाला, मी 30 वर्षांची असून भाऊ 32 वर्षांचा आहे. आता मला खूप विचीत्र वाटंतंय. तिने पुढे लिहीलेय, लहान असताना मला दत्तक घेण्यात आले होते. त्याबाबत तिला ती महाविद्यालयात गेल्यावर कळले. तरुणीला तिच्या प्रियकराने सांगितले होते की, त्यालाही दत्तक घेण्यात आले होते. दोघे नशीबवान होतो दोघांनाही खूप चांगली कुटुंब मिळाली होती. पुढे तरुणीने सांगितले की, आमचं नातं आतापर्यंत खूप चांगल राहिलं आहे. आम्ही दोघं लवकर एकमेकांना समजू लागलो. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो. तिने पोस्टमध्ये म्हंटले आहे की, याआधी तरुणी एवढ्या लवकर कोणाच्या जवळ आली नव्हती. आता तिला वाटते कदाचित भाऊ असल्यामुळे तरुणी त्याच्यासोबत कम्फर्टेबल होती.
तरुणीला डीएनए टेस्टच्या माध्यमातून तिची आणि तिच्या प्रियकराच्या नात्याची माहिती मिळाली. तिने सांगितले आम्ही आमच्या खऱ्या आई-बाबांविषयी जाणून घेऊ इच्छित होतो. पण याआधीच आम्ही दोघं भाऊ बहिण असल्याचा खुलासा झाला. त्यामुळे तो फार मोठा आघात होता. मी याबाबत अद्याप प्रियकर असलेल्या भावाला सांगितले नाहीय. पण आता तरुणी ही चाचणी चुकीची असो अशी प्रार्थना करतेय. ते दोघंही पुन्हा एकदा टेस्ट करणार आहेत. तिच्या या पोस्टमुळे युजर्सही चकीत झाले आहेत. एका युजरने लिहीलेय जगात 700 कोटी लोकं आहेत, काय अडचण आहे. दुसऱ्या युजरने लिहीलेय, यामध्ये दोघांची चूक नाहीय, मात्र आता दोघे एकत्र राहू शकत नाहीत.



























































