
एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडचा मातृविरह कमी करण्यासाठी आणि त्याच्या आयुष्यातील आईची जागा भरून काढण्यासाठी चक्क त्याच्या वडिलांशी लग्न केले आहे. टीकटॉक युजर असलेल्या @ys.amri हिने तिच्या आयुष्यात घडलेला किस्सा टीकटॉकवरून शेअर केला आहे.
‘काही दिवसांपूर्वी माझ्या प्रियकराच्या आईचे निधन झाले. तो खूप दु:खी होता. त्याचे दु:ख कमी करण्यासाठी मी काहीही करू शकत होते. त्याला मी दु:खी पाहू शकत नव्हते. त्यामुळे मी त्याची आई व्हायचे ठरवले. मी त्याच्या वडिलांशी लग्न केले आहे. आता माझ्या रुपात त्याला त्याची आई मिळाली असून मी आता आई बनून त्याच्यावर प्रेम करेन’, असे त्या
टीकटॉक युजरने सांगितले आहे.
फेब्रुवारी महिन्यात एक महिला तिच्या गरोदर मुलीच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. तिच्या या वागण्याने तिच्या मुलीला जबर धक्का बसला होता. जेस अलड्रीज असे त्या मुलीचे नाव होते व ती प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल असताना तिची आई तिच्याच प्रियकरासोबत पळू गेली.




























































