एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या गुप्तांगात गोळ्या झाडून हत्या

प्रेमात पडलेला माणूस हा देहभान विसरतो असे म्हणतात. एकतर्फी प्रेम असेल तर तो माणूस वेडापिसा झालेला असतो आणि तो वाट्टेल ते करायला तयार असतो. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने त्याचे ज्या तरुणीवर प्रेम होते तिच्यासह दोघांची हत्या केली. त्याने केलेल्या गोळीबारात तरुणीच्या कुटुंबातील 4 जण जखमी झाले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील लखीसरायमधील असून छठ पूजेच्या दिवशी हा सगळा प्रकार घडला आहे.

छठ पूजा झाल्यानंतर पूजा ( बदललेलं नाव) आणि तिच्या घरची मंडळी घराकडे परतत होती. लखीसराय मधल्या कबैय्या भागातील पंजाबी मोहल्ल्यात पूजाचे कुटुंब राहात होते. पूजा आणि तिच्या घरचे घरी पोहोचताच त्यांच्या घरातून गोळीबाराचा आवाज आला होताय. शेजारपाजारचे जेव्हा पूजाच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना 6 जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. छठ पूजेच्या दिवशी झालेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. या सगळ्यांना सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये 4 पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. तपासणी केल्यानंतर 6 जणांपैकी दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

पोलिसांनी सदर घटनेचा तपास सुरु केला असता सुरुवातीला स्थानिकांपैकी कोणी बोलायला तयार नसल्याने त्यांना अडचणी येत होत्या. तपासादरम्यान त्यांना कळाले की हा हल्ला पूजाच्या शेजारी राहणाऱ्या तरुणानेच केला होता. आशिष चौधरी असे हल्लेखोराचे नाव असून त्याचे पूजावर एकतर्फी प्रेम होते असेही पोलिसांना कळाले. पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांनी घटनेबाबात माहिती देताना सांगितले की पूजा आणि आशिषच्या कुटुंबियांमध्ये 10 दिवसांपूर्वी वाद झाला होता. आशिषला पूजाशी लग्न करायचं होतं. मात्र पूजा आणि तिच्या घरची मंडळी याला तयार नव्हती. आशिष हा जातीबाहेरचा असल्याने त्याच्याशी लग्न लावून देण्यास पूजाच्या घरचे तयार नव्हते. यामुळे आशिष भडकला होता. पूजा आणि तिच्या कुटुंबियांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने हा आशिषने हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पूजाच्या गुप्तांगावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या असेही पोलिसांनी सांगितले आहे. आशिष हल्ल्यानंतर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.