अक्षय खन्नाला ऑस्कर द्या… ‘धुरंदर’मधल्या ‘रेहमान डकैत’वर फराह खान फिदा

‘धुरंदर’ चित्रपट प्रदर्शित होताक्षणी या चित्रपटातील अक्षय खन्नाने साकारलेला रेहमान डकैत सर्वांनाच खूप आवडला. अक्षय खन्नाच्या अभिनयाचे केवळ प्रेक्षकांकडूनच कौतुक झाले नाही. तर बाॅलीवूडमध्येही अक्षय खन्नाचे तोंडभरून कौतुक होऊ लागलेले आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि आर माधवन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘धुरंधर’ सध्या बाॅक्स आॅफीसवर धुमाकूळ घालत आहे.

रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तीन ते चार दिवसांमध्ये या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला कमावला. रणवीर सिंह या चित्रपटाचा प्रमुख चेहरा असला तरी, रणवीरला तगडी फाईट दिलेली आहे ती अक्षय खन्नाने. अक्षय खन्नाचा ‘छावा’ चित्रपटातील अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता लगेच लागोपाठ त्याच्या ‘रेहमान डकैत’ या पात्राने वाहवा मिळवली आहे. लागोपाठ अक्षयने दोन्ही चित्रपटांमध्ये विलनची भूमिका साकारून स्वतःला सिद्ध केले आहे.

सिनेमागृहातून ‘धुरंधर’ पाहून निघालेला प्रत्येक जण रेहमान डकैतचं म्हणजेच अक्षयचं तोंडभरून कौतुक करत आहे. त्याच्याच या कामावर फिदा होऊन प्रसिद्ध दिग्दर्शक फराह खान हिनेही या चित्रपटासोबत आदित्य धर याच्या दिग्दर्शनाचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अक्षय खन्नाचं कौतुक केलं आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिने अक्षयची खूप वाहवा केली आहे. अक्षयला थेट आॅस्कर मिळायला हवं अशीही मागणी फराहने केली आहे.