वृत्तपत्र विक्रेतांना लसीकरणात प्राधान्य द्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्याकडील प्रत्येक लाईन बॉय किमान 60 ते 100 घरात दररोज वृत्तपत्र पोहचवितो. मुंबई-ठाण्यात जवळपास 8 ते 10 हजार वृत्तपत्र विक्रेते कोरोना संकटकाळातही आजमितीस कार्यरत आहेत. लाईन बॉय तीस हजार आहेत. विचार करा, किती लाख घरात दररोज वृत्तपत्र जात आहेत. फ्रंटलाईन वर्कर म्हणून राज्य सरकारने व महानगरपालिकेने वृत्तपत्र विक्रेत्यांना पहिली लस देणे गरजेचे आहे, अशी मागणी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने संजय चौकेकर व बाळा पवार यांनी केली आहे.