एस टी संघटना बिथरली, बीडमध्ये शिवशाही फोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

एस टी कर्मचाऱ्याचा संप चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे कर्मचारी ऑन ड्युटी आहेत त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बस वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यासाठी माजलगाव आगाराची बीड -माजलगाव शिवशाही बस बीड शहरात अज्ञातांकडून फोडण्यात आली.

एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे, संपात सहभागी असणाऱ्या बीड जिल्ह्यातील १२१ वाहक-चालक कर्मचाऱ्यांना तातडीने रात्री निलंबित करण्यात आले, यामुळे संघटनेचे पदाधिकारी बिथरले आहेत. हा संप यशस्वी करण्यासाठी प्रवाशाला वेठीस धरले जात आहे. बीडहून माजलगाव कडे जाणारी शिवशाही बस बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फोडण्यात आली. यामुळे शिवशाही बस तूर्त थाबवण्यात आल्या आहेत.