गोवा बोर्डाचा दहावीचा विक्रमी 99.72 टक्के निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. एकूण 23,967 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 23,900 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल 99.72 टक्के लागला आहे. आतापर्यंतच्या दहावीच्या निकालात यंदाचा निकाल सर्वाधिक असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये यांनी दिली.

यंदा 23,967 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात 13,011 विद्यार्थी तर 10,956 विद्यार्थिनी होत्या. याव्यतिरिक्त अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही निकाल आज जाहीर करण्यात आला. यावेळच्या निकालात विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.50 टक्के, तर विद्यार्थिनी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.98 टक्के आहे.