गोव्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची वाढ तीन आकडी

351

गोव्यात कोरोना आता वेगाने फैलावू लागला आहे. गेले दोन दिवस अनुक्रमे 95 आणि 94 रुग्ण मिळाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काल त्यात भर पडली. आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 108 रुग्ण काल एकाच दिवसात आढळले आहेत. त्यातच मुरगावचे 72 वर्षीय नगरसेवक पाश्कोल डिसोझा यांचे कोविड इस्पितळात निधन झाले. त्यामुळे मृतांचा आकडा 7 झाला आहे.

परवा कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. पुडतरी येथील 74 वर्षीय महिला कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. तिचा आणि खारेवाडा-वास्को येथील 45 वर्षीय व्यक्तीचा परवा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 6 वर गेला होता. राज्यात 1684 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 853 सक्रिय असून 825 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पाचव्या रुग्णाच्या मृतदेहावर आज पूडतरी येथील सेंट आलेक्स चर्च परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. मांगोर हिलमुळेच राज्यात कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होऊ लागला आहे. मांगोर हिलमध्ये सध्या 241 रुग्ण असून मांगोर हिलशी निगडित रुग्णांची संख्या 270 वर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या