
सामना ऑनलाईन। पणजी
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती खालावली असून त्यांना दिल्लीहून गोव्यात आणण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पर्रीकर यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. पण आज सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. त्यानंतर एअर अॅम्बुलन्सने त्यांना गोव्यात आणण्यात आले आहे.
Goa CM Manohar Parrikar has been brought to Panaji, Goa today. Earlier visuals of the CM being brought outside AIIMS (All India Institutes of Medical Sciences) Delhi. pic.twitter.com/Y39ugip5lS
— ANI (@ANI) October 14, 2018
गेल्या एक महिन्यापासून पर्रीकर यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर 15 सप्टेंबरला ते मायदेशी परतले. यादरम्यान त्यांच्या अनुपस्थितीत गोव्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. शुक्रवारी पर्रिकर यांनी एम्स रुग्णालयातच कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेतली होती. फेब्रुवारी महिन्यापासून पर्रीकर आजारी असून ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर गोवा, मुंबई, दिल्ली व अमेरिकेतील रुग्णालयात उपचार करण्यात आले. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

































































