महालक्ष्मीला 32 लाखांचा हिरेजडीत मुकुट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कोल्हापूर

धनत्रयोदशीनिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाईची सोमवारी श्री धन्वंतरीदेवी रूपात अलंकारपूजा बांधण्यात आली होती. शरद मुनीश्वर यांनी ही पूजा बांधली होती. कोलकाता येथील अंबाबाईभक्ताने एक किलो सोन्याचा हिरे, पाचू माणिकजडीत 32 लाख रुपये किमतीचा मुकुट देवीचरणी अर्पण केला. सोमवारी अंबाबाईची अंलकारपूजा बांधण्यात आली तेव्हा देवीला हा मुकुट परिधान करण्यात आला होता.

summary- goddess mahalaxmi got gold crown