
थिएटर ऑफ रेलेवन्सच्या ‘गोधडी’ या मराठी नाटकाला प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित ‘गोधडी’ नाटक म्हणजे संस्कृतीचा आत्मशोध आहे. संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत विविध समाजातील सण, प्रथा, चालीरीती, परंपरा यांचा शोध घेऊन मानवी विवेकाचा नवा धागा विणणारा हा अनोखा प्रयोग आहे.
‘गोधडी’ नाटकात अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, प्रियंका कांबळे, तुषार म्हस्के, संध्या बाविस्कर, तनिष्का लोंढे, प्रांजल गुडीले, आरोही बाविस्कर आदींच्या भूमिका आहेत. दादर येथील शिवाजी नाटय़मंदिरात 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता ‘गोधडी’चा प्रयोग होईल.



























































