
उदगीर तालुक्यातील मौजे चांदेगाव येथे चोरट्यांनी दोन घरांवर दरोडा टाकला. यात जवळपास लाखांचा माल लंपास केला
चांदेगाव येथील प्रताप निवृत्ती मुसने यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल. घरातील लोखंडी कपाट आणि लोखंडी पेटीत ठेवलेले सोन्याचे 14 तोळ्याचे दागिने व चांदीचे दहा तोळ्याचे दागिने असा लाखो रुपयांचा लंपास केला. तसेच शेजारच्या घरातील चांदीच्या तीन तोळ्याच्या तीन अंगठ्याही लांबवल्या
या प्रकरणी प्रताप निवृत्ती मुसने यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्ररा दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घारगे हे करत आहेत.






























































