
सामना प्रतिनिधी । शिर्डी
अहमदाबाद येथील एका भक्ताने रविवारी साईचरणी 300 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण केला. या सुवर्णहाराची किंमत नऊ लाख रुपये आहे. या भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती साईबाबा संस्थानला केली आहे.
‘साईबाबांना सुवर्णहार अर्पण करण्याची आमची इच्छा होती ती आज पूर्ण झाली’ अशी प्रतिक्रिया भाविकाने व्यक्त केली. दरम्यान, संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी साईमूर्ती, शाल-श्रीफळ देऊन या साईभक्ताला सन्मानित केले. सायंकाळी धूपारती झाल्यानंतर सुवर्णहार साईबाबांच्या गळ्यात घालण्यात आला.






























































