पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जेष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकाविली

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वार चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील 23 हजारांची सोनसाखळी हिसकाविल्याची घटना बिबवेवाडीत घडली आहे. याप्रकरणी 71 वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घराशेजारील रस्त्यावरून चालत जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला.

त्यामुळे महिला त्यांना माहिती देत असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 23 हजारांची सोनसाखळी हिसकावून पसार झाले. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार तपास सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक किरण देशमुख यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या