सोने खरेदीकडे ग्राहकांची पाठ

372

दररोज गगनाला भिडणारे सोन्याचे दर आणि आर्थिक मंदीमुळे ग्राहकांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. 2019 मध्ये सोने खरेदी 9 टक्क्यांनी कमी झाली असून 2018 च्या तुलनेत 690 टन सोन्याची देशभरात विक्री झाल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने स्पष्ट केले आहे. 2020 मध्ये सोन्याची खरेदी वाढून 700 ते 800 टनापर्यंत जाईल, असा विश्वासही कौन्सिलने व्यक्त केला आहे. नव्या वर्षात सोन्याचे वाढणारे दर ग्राहक स्वीकारतील, असेही कौन्सिलने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या