
मार्च महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 2 मार्चला 24 पॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 67 हजार 471 रुपये तोळा होता. अवघ्या 15 दिवसांत सोन्याचा दर 1 लाख 47 हजार 218 रुपयांपर्यंत खाली आला आहे. याचाच अर्थ सोने 20 हजारांहून स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या दरातसुद्धा घसरण झाली आहे. 2 मार्चला चांदी 2 लाख 89 हजार 848 रुपये प्रति किलो होती. चांदीत 57 हजारांहून अधिक घसरण झाली असून चांदी प्रति किलो 2 लाख 32 हजार 364 रुपयांवर पोहोचली आहे. सोने आणि चांदीच्या दरात आगामी काळात आणखी घसरण होऊ शकते, असा अंदाजा तज्ञांनी वर्तवला आहे


























































