सोन्या-चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण, जाणून घ्या आजचा एक तोळ्याचा भाव

7183

अनलॉक-1 मध्ये देशातील जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. लग्नाचा सिजन असतानाही बंद असलेले सोन्या-चांदीच्या दुकान पुन्हा सुरू होत आहेत. याचा परिणाम सोन्या-चांदीच्या भावावरही होत आहे. शुक्रवारी सोन्याचा दर पुन्हा खाली आला. या आठवड्यात सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.

gold4

दिल्ली गोल्ड मार्केटमध्ये 22 कॅरेट पासून 24 कॅरेटपर्यंत सोन्याचा दर कमी झाला आहे. गेल्या 5 दिवसात सोन्याचा दर जवळपास 400 रुपयांनी कमी झाला आहे.सोन्यासह चांदी देखील किलोमागे 255 रुपयांनी स्वस्त झाली आहे. किलोचा दर 47 हजार 675 झाला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी, शेअर मार्केटमधील तेजी यामुळे सोन्या-चांदीचे दर पडल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

gold-price

1 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 43 होता, 2 जूनला हा दर थोडा वाढून 47 हजार 75 झाला, 3 जूनला यात घसरण होऊन हा दर 46 हजार 845 वर आला, 4 जूनला यात आणखी घसरण झाली आणि हा दर 46 हजार 767 रुपये झाला. 5 जूनला यात आणखी 67 रुपयांची घसरण झाली आणि दर 46 हजार 700 रुपयांवर स्थिरावला.

आपली प्रतिक्रिया द्या