सोने पन्नाशी पार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोन्याच्या दराने पन्नाशी पार केली आहे. कोरोनाचाच हा परिणाम आहे. लॉकडाऊनमध्ये व्यापार आणि उद्योगधंद्यांवर झालेला प्रतिकूल परिणाम, घसरलेला शेअरबाजार, बँकांच्या व्याजदरात झालेली घट यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा सोने खरेदीकडे वाढला आहे.

त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयाचा दर घसरला आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे सांगण्यात येते. सोन्याचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असले तरी महत्वाच्या शहरांमध्ये सोन्याने पन्नास हजारांचा टप्पा पार केला आहे. दिल्लीत आज चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 50050 तर मुंबईत 50120 रुपये होता. चेन्नई आणि हैदराबादमध्ये तोळ्याला 50940 रुपये दर होता. भविष्यात सोन्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.