Gold-Silver Rate – सोन्यात तेजी, चांदीत घसरण; जाणून घ्या नवीन दर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुक्रवारी बाजारात अखेरच्या दिवशी सोन्याच्या किंमतीत तेजी आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात सोने प्रति तोळा 21 रुपयांनी वाढले. सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असली तरी चांदीचा किलोचा दर मात्र 259 रुपयांनी खाली आला.

gold

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा दर वाढल्याने हिंदुस्थानच्या बाजारात देखील तेजी दिसली. 21 रुपयांच्या वाढीसह 10 ग्राम सोन्याचा भाव 49 हजार 644 रुपये झाला आहे. तर चांदीचा दर किलोमागे 259 रुपयांनी कमी झाल्याने नवा दर 66 हजार 758 रुपये झाला.

gold-jewellery

म्हणून सोन्यात घसरण

दरम्यान, गेल्या 4 महिन्यात ओने 7 हजार रुपयांनी खाली आले आहे. कोरोना विषाणूवर लस येण्याचे सकारात्मक संकेत मिळत असल्याने सोन्याचा दर कमी होतोय. तसेच अमेरिका आणि चीनमधील तणावही कमी झाल्याने आणि लोक पुन्हा शेअर बाजाराकडे वळल्याने सोन्याचा भाव कमी होतोय.