
बजरंग क्रीडा मंडळाच्या ’अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त सुवर्ण चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला उद्या गुरूवारपासून प्रारंभ होत असून यात पुरूष गटाचे 21 संघ खेळणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनाला विजय क्लब विरुद्ध नवी मुंबई स्पोर्ट्स, अशोक मंडळ विरुद्ध इच्छाशक्ती आणि लायन्स स्पोर्ट्स विरुद्ध श्रीराम संघ अशा लढती रंगणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटनात युवासेनाप्रमुख आणि माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडेल. स्पर्धेत पुरुष गटाच्या विजेत्याला पाऊणलाखाचे तर उपविजेता 51 हजारांचे इनाम जिंकले. उपांत्य पराभूत संघ 21 हजारांची रक्कम मिळवेल.
स्पर्धेची गटवारी- अ गट- विजय क्लब, जॉली स्पोर्टस् नवी मुंबई स्पोर्टस्. ब गट- अंकुर स्पोर्टस्, अष्टभुजा मंडळ, उत्कर्ष मंडळ. क गट-जय भारत, केदारनाथ मंडळ, मोरया स्पोर्टस्. ड गट- स्वस्तिक मंडळ, बंडया मारुती मंडळ, श्री हनुमान मंडळ. इ गट-लायन्स स्पोर्टस्, श्रीराम संघ-पालघर, ओम कल्याण. फ गट- नवोदित संघ, शिवशंकर मंडळ, सुनील स्पोर्टस्. ग गट- अशोक मंडळ, इच्छाशक्ती मंडळ, मिडलाईन स्पोर्टस्.


























































